Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू
    क्राईम

    भरधाव दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    जळगाव-पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात जखमी दुचाकीस्वार प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हडसननजीक गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बापू दलपत पाटील (५६, रा. वेरुळी खुर्द, ता. पाचोरा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. नांद्रा गावाहून वेरुळीकडे बापू पाटील व कृष्णा शिवाजी पाटील (वय ४३) हे दुचाकी क्रमांक (एम. एच. १९ सी. एल. ०४३३) येत होते. त्यावेळी पाचोऱ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दुचाकीने (क्रमांक एम. एच. १९ बी. डब्ल्यू ११८५) समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बापू पाटील गंभीर जखमी झाले. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कृष्णा शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.