Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २८ वर्षीय महिलेने घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    २८ वर्षीय महिलेने घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskSeptember 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील किनगाव बुद्धक गावात निलीमा कोळी (वय २८) या महिलेने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार घडली, तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवासी नीलिमा संजय कोळी (वय २८) ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. दरम्यान, तिने आपल्या घरातील स्वयंपाक घरात दोर बांधून गळफास घेतला हा प्रकार तिचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली आणि विळ्याने दोर कापला. दोर कापल्यानंतर महिला जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा तातडीने त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.
    रुग्णालयात ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी संजय कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.