Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत झळकले बॅनर !
    क्राईम

    अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत झळकले बॅनर !

    editor deskBy editor deskSeptember 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई  : वृत्तसंस्था

    बदलापूर शहरातील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून तो ठार झाला. या घटनेवरून आता राज्यभरात वातावरण तापलंय. अत्याचाराच्या घटनेतील आरोपी मेल्याने सर्वसामान्य नागरिक आनंद व्यक्त करत असतानाच विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. हे एन्काऊंटर की पूर्वनियोजित हत्या असे म्हणत विरोधकांनी सरकारवर अनेक प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. शरद पवार, संजय राऊत, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, यांसारख्या अनेक नेत्यांनी या मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे.

    मात्र दुसरीकडे महायुतीचे नेते, भाजप , शिंदे गटातील नेते मात्र या घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देताना विरोधकांवरच टीका केली. अत्याच्याराच्या घटनेतील आरोपीचा खात्मा झाल्यावर विरोधकांच्या पोटात का दुखतंय, असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. दरम्यान आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरवॉर रंगलं आहे. “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” असा उल्लेख बॅनरवर असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही झळकतोय. एवढंच नव्हे तर या बॅनर्समधून मविआला देखील डिवचण्यात आलं असून ‘पोलिसांकडून वसूली करणार सरकार’ असाही उल्लेख काही बॅनर्सवर आहे. यामुळे आता नवा वाद सुरू पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

    मुंबईतील अनेक भागात हे बॅनर्स सध्या झळकत आहेत. ‘बदला पुरा’, “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” असा आशय असलेले अनेक बॅनर्स सध्या शहरात दिसत असून वांद्रे येथील कलानगरमध्येही ते झळकत आहेत. या बॅनर्सवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असून त्यांच्या हातात बंदूकही आहे. तसेच “अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस कोण? एंकाऊंटर फेम प्रदिप शर्माबरोबर केलं होतं काम” असा आशय असलेले हे निनावी बॅनर्स चर्चेचा विषय छरे आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोठी बातमी : वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा: दोन महिला व एक पुरुष ताब्यात

    August 13, 2026

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.