Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्यावर गावठी कट्टा घेवून फिरणारे दोघे ताब्यात
    क्राईम

    रस्त्यावर गावठी कट्टा घेवून फिरणारे दोघे ताब्यात

    editor deskBy editor deskSeptember 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    वरणगाव-मुक्ताईनगर महामार्गावर आयुध निर्माणी फाट्यावर मुक्ताईनगर येथील दोघांना गावठी कट्टा, मॅगझिन व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एपीआय भरत चौधरी यांनी केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संतोष भालेराव (वय २३, रा. आंबेडकर नगर, मुक्ताईनगर) व अनिरुद्ध कैलास ठाकूर (वय २०, रा.सुराणा नगर मुक्ताईनगर) हे दि. २२ रोजी मुक्ताईनगर रस्त्यावर फिरत असल्याची माहिती चौधरी यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एकूण ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे, मनोहर राजाराम पाटील यांनी कारवाई केली. मनोज म्हस्के यांनी फिर्याद दिली. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !

    February 28, 2026

    आंध्र प्रदेशात फटाक्यांचा भीषण स्फोट; १८ ठार !

    February 28, 2026

    चेंबूरमध्ये मृत्यूचा थरार; ८० फूटांवरून ६ कामगारांचा पडझड, एक ठार !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.