जळगाव : प्रतिनिधी
जळके ता.जळगाव येथे जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश जगन्नाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी विठ्ठलमंदीरात जळगाव येथील तारांगण हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील यांच्या मार्फत जळके तसेच परिसरातील गावांतील लहान बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी एकुण १८३ बालकांची नोंद करून बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना गोळ्या -औषधे देण्यात आली , याठिकाणी तीन बालकांना त्वचेसंबधी समस्या असल्याचे आढळले त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
या तपासणी शिबिराला डॉ.राहुल पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी अमोल पाटील, गोपाल दांडगे व औषध विभागासाठी राहुल महाजन,सागर पाटील यांचा सहभाग होता तर त्यांना गावातील डॉ.प्रकाश परदेशी, डॉ.दिपक पाटील, डॉ.प्रशांत पाटील यांनी सहकार्य केले .
बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तथा ह.भ.प.रामचंद्र महाराज, सुभाष आण्णा पाटील, धनराज पाटील, सुभाष मकासरे,उत्तम पाटील (मॅनेजर दादा), प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, सुभाष पाटील सर, संजय पाटील सर,बापु पाटील यांची उपस्थिती होती.हे बालकांचे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी बबलू जाधव, संदिप पाटील,किरण पाटील, ईश्वर चिमणकारे, अमोल पाटील व धनराज पाटील यांचं अनमोल सहकार्य लाभले . या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजक जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश आप्पा पाटील यांनी समाधान व्यक्त केले तसेच या पुर्वीही वाढदिवसानिमित्त त्यांनी राबविलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि डॉ.राहुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले