भुसावळ : प्रतिनिधी
तीन लाखांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यात तीन जणांना ताब्यात साडयात आले. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. बाजारपेठ पोलिसांनी नकली नोटा घेऊन आलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हे संशयित जळगाव, भुसावळ व रावेर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या नोटा संशयित आरोपींनी कुठून आणल्या? याआधी किती वेळा त्यांनी बाजारात नकली नोटा विक्री केल्या? त्यांचा गॉडफादर कोण? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतर समोर येऊ शकतात.