Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून वसंतवाडीतील अंगणवाडीला थोर पुरुषांच्या प्रतिमा भेट
    जळगाव

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून वसंतवाडीतील अंगणवाडीला थोर पुरुषांच्या प्रतिमा भेट

    editor deskBy editor deskAugust 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वसंतवाडी तालुका जळगाव येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण व प्रविण पाटील यांना आमच्या अंगणवाडीसाठी मंत्री महोदय यांच्याकडून थोर पुरुषांच्या प्रतिमा मिळवून देण्याची मागणी केली सदर विषय जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे तसेच युवा नेते प्रतापराव पाटील यांच्याकडे केला.

    कुठलाही विलंब न करता नियमित समाज सेवेत अग्रेसर असणाऱ्या प्रतापराव पाटील यांनी मंत्री महोदय यांच्याकडून वसंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतवाडी व वसंतवाडी येथील दोन्ही अंगणवाडीना थोर पुरुषांच्या प्रतिमांचे संच हे भेट म्हणून दिले.

    अंगणवाडी येथे थोर पुरुषांच्या प्रतिमा संच कार्यकुशल नेतृत्व प्रतापराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका सौ. उज्वला पाटील, मदतनीस सौ.भारती सोनार यांना देण्यात आले यावेळी जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश पाटील , जळगाव तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष पि.के.पाटील , शिवसेना जळगाव तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण, जळगाव ग्रामीण मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष सौ.अनिता चिमणकारे,जळके वि.वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील जेष्ठ नागरिक वेडु चिमणकारे,अरुण सोनार सुपडु चिमणकारे व सौ.केशरबाई चिमणकारे उपस्थित होते. थोर पुरुषांच्या प्रतिमांचा संच दिल्याबद्दल अंगणवाडी कर्मचारी यांनी नामदार गुलाबराव पाटील यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.