भुसावळ : प्रतिनिधी
शहरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपीचं नाव जगन धर्मा कोळी (४४) रा. अयोध्यानगर भुसावळ असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्यानगर भागात पालिका संकुलात आयुष्यमान आरोग्य मंदिर बंद कार्यालयाजवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावरून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ दहा हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्टल (कट्टा) मिळून आला. पोलिस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत असल्याने ताब्यात घेतले. या प्रकरणी पो.कॉ. राहुल नारायण भोई यांनी खबर दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.