Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल : सुप्रिया सुळेंनी बैठक सोडून गाठले ब्रीच कँडी !
    क्राईम

    शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल : सुप्रिया सुळेंनी बैठक सोडून गाठले ब्रीच कँडी !

    editor deskBy editor deskNovember 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

    पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू असलेली महत्त्वाची पक्षाची बैठक अर्धवट सोडून तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे पवार यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

    शरद पवार यांच्या प्रकृतीची गेल्या काही दिवसांपासून नियमित काळजी घेतली जात आहे. साधारण १५ दिवसांपूर्वीही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

    शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा सुरू होती. मात्र, वडील शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी बैठक अर्धवट सोडली आणि कोणताही विलंब न करता ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. तेथे त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. पक्षातील प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच वेग आला आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा असून, सुप्रिया सुळे यांच्याकडून रुग्णालयातील भेटीनंतर माध्यमांना माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतकऱ्यांच्या हातात आता रिक्षाचे स्टेअरिंग : १ लाख रिक्षा वाटपाचा सरकारचा प्रस्ताव !

    November 26, 2026

    पंढरपूरला देवदर्शनासाठी गेले अन् चोरट्यांनी घर फोडले! रेल्वे स्टेशनवरून मुख्य आरोपी जेरबंद

    November 26, 2026

    कजगावमध्ये गुन्हेगारांचे धाडस वाढले? तरुणावर गोळी झाडली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

    November 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.