Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जम्मूत पुन्हा दहशतवाद्यांकडून हल्ला ; एक जवान जखमी
    क्राईम

    जम्मूत पुन्हा दहशतवाद्यांकडून हल्ला ; एक जवान जखमी

    editor deskBy editor deskJuly 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील जम्मू काश्मीर येथे गेल्या काही महिन्यापासून दहशतवाद्यांकडून हल्ला होत असल्याच्या घटना नियमित घडत आहे. नुकतेच जम्मूच्या राजौरी येथे सोमवारी 22 रोजी सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी राजौरीतील गुंधा येथील 63 आरआर आर्मी कॅम्पवर गोळीबार केला, ज्यावर प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली.

    यावेळी एका जवानाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अधिक सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

    16 जुलै रोजी जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील देसामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले. एका पोलिसाचाही मृत्यू झाला. ८ जुलै रोजी कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ)सह ५ जवान शहीद झाले होते. 22 एप्रिलपासून जम्मू भागात 10 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये 12 जवान शहीद झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात ड्रग्जविरोधी मोठी कारवाई; पहूर पोलिसांचा धडक छापा, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    March 4, 2026

    जळगाव शहरात गोवंश वाहतूक प्रकरणावर दगडफेक, दोन तरुण गंभीर जखमी

    March 4, 2026

    तावडे–आठवले यांना पुन्हा संधी; राज्यसभेसाठी भाजपची नवी रणनीती

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.