Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील पाच स्थानबद्ध, ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई
    क्राईम

    जिल्ह्यातील पाच स्थानबद्ध, ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

    editor deskBy editor deskJuly 20, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील रावेर व पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करत चार जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १९ रोजी दिले तसेच भोलाणे (ता. जळगाव) येथील किरण श्रावण कोळी (वय २८) या आरोपीलाही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबध्द करत त्याची ठाणे कारागृहात रवानगी केली आहे. त्याच्या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रस्ताव तयार केला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या शेख तोसिफ शेख अफजल (२८, रा. रावेर); अयुब बशीर तडवी (५५, रा. कुसुंबा, ता. रावेर), मगन मुरलीधर करवले (४३, रा. अटवाडे, ता. रावेर) व पिंपळगाव पोलिस ठाणे हद्दीतील मनोहर उर्फ मोहन उखडू कोळी (५५, रा. लोहारी, ता. पाचोरा) या चौघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. चौघांची मुंबई व ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, दि. २३ जानेवारी २०२२ ते ५ मार्च २०२३ दरम्यान किरण श्रावण कोळी याच्याविरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच कारवाया केल्या आहेत. ‘हातभट्टी’ची दारू पाडणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या या आरोपीची पाच पैकी दोन गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता झाली आहे.

    अन् ती गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत, तसेच या आरोपीवर दोनदा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. या आरोपीकडून सातत्याने हातभट्टीची दारू विक्री होत असल्याने आणि कारवाई करूनही आळा बसत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी गंभीर दखल घेतली आणि एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १८ जुलै रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आरोपीला ताब्यात घेतले आणि ठाणे कारागृहात त्याची रवानगी केली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी

    December 13, 2025

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    माझ्यावर एवढं प्रेम का? अमिताभ बच्चन यांचा मनाला स्पर्श करणारा ब्लॉग

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.