जळगाव : प्रतिनिधी
बालाजीपेठ परिसरातून एका वृध्दाच्या उघड्या घरातून १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओंकार सोनवणे (वय २०, रा. रिधूरवाडा ता. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कन्हैय्या प्रजापती (वय ६२, रा. ओम नगर) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांचे बालाजी पेठमधील ओम नगरात जुने घर आहे. त्या ठिकाणी ते जेवण करून आराम करण्यासाठी जात असतात. ते दरवाजा उघडा ठेवून पलंगावर झोपले असतांना संशयिताने घरात घुसून १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर वृद्धाने शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.