Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विषारी औषध सेवन केल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू !
    क्राईम

    विषारी औषध सेवन केल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील प्रेम नगरात राहणाऱ्या व्यापाऱ्याने विषारी औषध घेऊन विनोद पूनमचंद जैन (चोरडिया) (वय ४४, रा. प्रेम नगर) यांनी आत्महत्या प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दि. ४ जुलै रोजी घडली होती. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असतांना शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रेम नगर परिसरात विनोद जैन हे व्यापारी आपल्या कुटुं‌बासह वास्तव्यास होते. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये त्यांचे दुकान दुकान असून व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवार दि. ४ जुलै रोजी सकाळी उठल्यावर विनोद यांनी साडेआठ वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कुटुंबीयांना समजताच तात्काळ विनोद जैन यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.