धरणगाव : प्रतिनिधी
महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, फुलपाट येथील तरुण दत्तू प्रकाश पाटील (वय ३५) हे आपली दुचाकी (एमएच – १९, बीटी – १०१५) ने दुपारी ५ वाजेचा सुमारास काम आटोपून घरी चालले होते. याच वेळी महामार्गावरून भरधाव वेगाने डंपर (एमएच १९, झेड-३७५१) हा जळगावकडे जात असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून डोक्याला गंभीर इजा व मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दत्तू पाटील यांच्या पत्नी मंगलबाई पाटील या फुलपाटच्या सरपंच आहेत. तर हे डंपर पाळधी पोलीस चौकीत जमा करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते