भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील गजानन मंदिर परिसरात बंदघर फोडून ३ लाख १८ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहितीनुसार, नरेश घनश्यामदास रोहडा (वय ३२, रा. गजानन महाराज मंदिर, भुसावळ) हे परिवारासह वास्तव्याला आहेत. खासगी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २९ रोजी सकाळी १० वाजता ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेर पडले. चोरट्यांनी संधी साधत घर फोडून कपाटातील ३ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. तपास पोलिस नाईक एकनाथ पाटील करीत आहेत.