Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विधानपरिषदेसाठी भाजपच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत ?
    राजकारण

    विधानपरिषदेसाठी भाजपच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत ?

    editor deskBy editor deskJune 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात लोकसभा निवडणुक संपली असतांना आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती सुत्राकडून मिळत आहे.

    पंकजा मुंडे, अमित गोरखे,परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे , चित्रा वाघ, माधवी नाईक,
    जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार स्मारक व संग्रहालयाचा वाद; जय-पार्थ पवार यांची भूमिका भिन्न

    February 11, 2026

    ‘जन गण मन’पूर्वी वाजणार ‘वंदे मातरम’; केंद्राचे नवे नियम जाहीर

    February 11, 2026

    अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह; रोहित पवारांची भावनिक पत्रकार परिषद

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.