जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणात मध्यप्रदेशातील छनेरा गावामधून विष्णू पथरोड याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्याला भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दुहेरी हत्याकांडप्रकरणी आता अटकेत असलेल्या संशयित आरोपींची संख्या ५ वर पोहोचली आहे. यापूर्वी राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया, करण पथरोड, गोपाल कोळी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान छनेरा गावात विष्णू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन विष्णुपथ रोड याच्यासह त्याच्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी अंती दोन्ही नातेवाईकांना सोडून देण्यात आले आहे. तर विष्णू पथरोड याला अटक करून भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.