यावल : प्रतिनिधी
किनगाव येथील एका किराणा दुकानातून शुक्रवारी अडीच लाख रुपयांचा गुटखा सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग आणि त्यांच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, किनगाव, ता. यावल येथील अनिल किराणा दुकानात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने किनगाव येथे छापा टाकून हा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिस नाईक अल्ताफ अली हसन अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किराणा दुकानदार जगन्नाथ पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये व पोलिस करीत आहे.