भुसावळ : प्रतिनिधी
अष्टभूजा देवी मंदिरासमोरील रस्त्यावर दोन मित्र उभे असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी शिवीगाळ करत दोघांकडून ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरी हिसकावून नेले. ही घटना रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दीपक देवीदास धनगर (वय ३३, रा. अकुलखेडा ता. चोपडा) आणि त्याचा मित्र गणेश असे दोघेजण रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अष्टभूजा देवी मंदिराजवळ उभे होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी त्याच्याजवळ येऊन शिवीगाळ करून दमदाटी केली. दीपकजवळील २९ हजारांची रोकड आणि गणेश जवळील दीड हजार व मोबाइल हिसकावला.