भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली. मागणीची पूर्तता न केल्याने मिरज येथे सासरी मारहाण करीत छळ केला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या हर्षिता दीपक मेघानी (वय ३०) यांचा विवाह सांगली जिल्ह्यातील मिरज येथील दीपक अशोक मेघानी यांच्याशी झाला. दरम्यान, लग्नाच्या सहा महिन्यांनंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरूवात केली. दीपक मेघानी याने व्यवसाय करण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैशांची मागणी पूर्ण केली नाही, याचा राग आल्याने दीपक मेघानी, सासरच्या कुटुंबीयांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता या माहेरी निघून आल्या. १९ रोजी रात्री बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती दीपक मेघानी, सासू आशा, सासरे अशोक, नणंद दीपा अशोक मेघानी सर्व रा. मिरज, जि. सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक कांतीलाल केदारे करीत आहेत