• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात कंपनीला भीषण आग : २० पेक्षा अधिक कामगार गंभीररित्या भाजले

editor desk by editor desk
April 17, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात कंपनीला भीषण आग : २० पेक्षा अधिक कामगार गंभीररित्या भाजले

जळगाव : प्रतिनिधी

येथील एमआयडीसीमधील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला बुधवार (दि.१७) रोजी सकाळी ९ वाजता भीषण आग लागली. या आगीत २० हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेले आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत आज १७ रोजी सकाळी ९ वाजता केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची मात्र माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे ३ ते ४ अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले.

यावेळी कंपनीच्या लागलेल्या आगीत आगीचे मोठे लोळ बाहेर पडताना दिसत होते. याआगीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणारे २० हुन अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत हेमंत गोविंदा भंगाळे (वय- २७, प्रभात कॉलनी), मयूर राजू खैरनार (वय-२७, रा.जुना खेडी रोड), विशाल रवींद्र बारी (वय -२८,रा. श्रीकृष्ण नगर जुने जळगाव), सचिन श्रावण चौधरी (वय-२४, रा.रामेश्वर कॉलनी), गोपाल आत्माराम पाटील (रा. विखरण ता.एरंडोल ह. मु. आयोध्या नगर), भिकन पुंडलिक खैरनार (वय-४२, रा. इच्छा देवी परिसर), चंद्रकांत लक्ष्मण पाटील (वय-२४, रा. धुळे ह.मु. रामेश्वर कॉलनी, जगजीवन) अनंत परब (वय-५३, रा.आयोध्या नगर), रमेश अजमल पवार (वय-२१, रा. रामेश्वर कॉलनी), नवाज समीर तडवी (वय -५१, रा.अशोक किराणा दुकान, रामेश्वर कॉलनी), दीपक वामन सुवा (वय -२५, रा.विठोबा नगर, कालिका माता नगर), नंदू छगन पवार (वय-३५, रा. रामेश्वर कॉलनी), कपिल राजेंद्र पाटील (वय-२४, रा. आव्हाने ता. जळगाव) ,आनंद छगन जगदेव (वय-३८ रा. रामेश्वर कॉलनी), गणेश रघुनाथ सोनवणे (वय-५०, रा. सुप्रीम कॉलनी), फिरोज रज्जाक तडवी (वय-४०, रा. रामेश्वर कॉलनी), किशोर दत्तात्रय चौधरी (वय-५० रा. रामेश्वर कॉलनी) चंद्रकांत दशरथ घोडे रावत (वय-४७ रा रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरून येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यातील चार ते पाच कामगारांची प्रकृती गंभीर आहे. अजून जखमी कामगारांचा आकडा वाढविण्याची शक्यता आहे. यावेळी एमआयडीसीतील कंपनी आणि हॉस्पिटल येथे जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारांची आणि मित्र नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

Previous Post

मोठी बातमी : आ.एकनाथ खडसेंना जीवे ठार मारणाची धमकी

Next Post

व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा होणार !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group