भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील ममता हॉटेल जवळील एका दुकानासमोर अडवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हंसराज व आतीश रवींद्र खरात या दोन्ही भावांविरूध्द खंडणीचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील झेडआरटीआय कॉलनीते नरेंद्र अरूण मोरे हे दि. ७ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता ममता हॉटेलजवळील एका दुकानासमोरुन जात होते. यावेळी हंसराज उर्फ रितीक व आतिश खरात या भावंडांनी मोरे यांना अडवित त्यांच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितली. मोरे यांनी खंडणीची रक्कम न दिल्याने त्यांना शिवीगाळ करीत घरात शिरून मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात खरात बंधू विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किशोर पवार पुढील तपास करीत आहे.


