भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका भागात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. पीडितेने सतर्कता दाखवून आरोपीच्या तावडीतून पळ काढला. या प्रकरणी महेश ज्ञानेश्वर तायडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, गुरुवारी आरोपीने पीडितेला घरात नेत पाणी देण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. मात्र, पीडितेने सतर्कता दाखवून पळ काढला. यावेळी जमावाने आरोपीला चांगलेच चोपून काढले. गुरुवारी रात्री उशिरा आरोपीविरोधात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोल्ली करीत आहेत.