Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अपात्र झाल्याचा गैरसमज : तलवार, चॉपरने हल्ला !
    क्राईम

    अपात्र झाल्याचा गैरसमज : तलवार, चॉपरने हल्ला !

    editor deskBy editor deskApril 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    तालुक्यातील भोकरी येथे सरपंचपदावर असताना तक्रारी केल्यानेच आपण अपात्र झाल्याचा गैरसमज करून घेत एकाने आपल्या मित्रांसह तरुणावर तलवार व चॉपरने हल्ला केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या वरखेडीजवळील भोकरी येथे रविवारी सायंकाळी रफिक शब्बीर काहकर हा नमाज पठण करून बाहेर आला असता अरमान अब्दुल्लाखा काहकर याने तलवारीने, अब्दुल मिठू काहकर याने लोखंडी टॉमी, इमरान शफिक काहकर याने चॉपर व इमरान अब्दुल काहकर याने लोखंडी रॉडने डोक्यात व छातीवर जोरदार मारहाण केली. यात रफिक हा गंभीर जखमी झाला.

    यावेळी अरमान हा रफिक यास म्हणाला की, ‘मी सरपंचपदावर असताना तू मित्रांसह माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या. त्यामुळेच मी अपात्र ठरलो.. त्यामुळे तुला जिवे मारून टाकेल.’ याबाबतची फिर्याद पिंपळगाव हरे पोलिस स्टेशनला रफिक शब्बीर काहकर याने दिली. त्यानुसार ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल पवार, सपोउनि विजय माळी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा

    June 28, 2026

    गिरणा नदीपात्रातील वाळूमाफियांवर पोलिसांचा दणका; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    June 28, 2026

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.