वरणगाव : प्रतिनिधी
वरणगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील कर्मचाऱ्यालाच शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना शनिवार, दि ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता तीन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये दि ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी योगेश पाटील हे कर्तव्यावर असताना भुसावळ तालुक्यातील फुलगावातील महेंद्र काशीनाथ पाटील, राहुल काशीनाथ पाटील आणि ज्योती काशीनाथ पाटील हे पोलीस ठाण्यात आले. पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी राहुल पाटील यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना राग आल्याने तिघांनी पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करत धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर रात्री ११ वाजता पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून – महेंद्र काशीनाथ पाटील, राहुल काशीनाथ पाटील आणि ज्योती काशीनाथ पाटील (तिघे राहणार फुलगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.