जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील उमाळा ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी व घरपट्टीचे बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रूपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. संदीप चंद्रभान निकम रा. जामनेर असे अटक केलेल्या तत्कालीन ग्रामसेवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमाळा ग्रामपंचायतमध्ये १३ मार्च २०२३ ते ३ जुलै २०२३ च्या दरम्यानच्या काळात संशयित आरोपी संदीप चंद्रभान निकम हे ग्रामसेवक पदावर होता. त्यावेळी ग्रामसेवक पदावर असतांना पाणीपट्टी व घरपट्टीची बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात पंचायत समितीचे अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारी रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान संशयित संदीप निकम यांच्यावर बोदवड पोलीस स्टेशन येथे देखील अपराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला बोदवड पोलिसांनी अटक केली होती. आता उमाळा ग्रामपंचायतीत अपहार केल्याच्या प्रकारणात देखील एमआयडीसी पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम याला अटक केली आहे. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.