• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बस व ट्रकचा अपघात : १२ प्रवासी जखमी

editor desk by editor desk
March 12, 2024
in क्राईम, रावेर
0
बस व ट्रकचा अपघात : १२ प्रवासी जखमी

रावेर : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे ब-हाणपूर बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण १२ प्रवासी जखमी झाले, यातील पाचजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास विवरे गावाजवळ घडला, याप्रकरणी निंभोरा पोलिसांत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे – ब-हाणपूर बस (क्र. एमएच ४० वाय १८७) ही ४१ प्रवासी घेऊन विवरे बुद्रुकहून रावेरकडे येत असताना स्मशानभूमीजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एचआर ५५ एक्स २९८३) जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकाच्या मागील बाजूच्या पाच ते सहा खिडक्यांसह बसचा पत्रा चिरला आणि बस रस्त्याच्याखाली उतरली. या अपघातात एकूण १२ जण जखमी झाले आहेत.

त्यातील पाच प्रवाशांच्या तोंडाला. डोक्याला, छातीला गंभीर दुखापती झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांच्या पथकाने तातडीचे प्राथमिक औषधोपचार केला. पाचजणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सातजण किरकोळ जखमी झाले होते. त्यांना औषधोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. निभोरा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी नाराजी व्यक्त केली. बसचालक डी. डी. पाटील व वाहक एस. एस. जाधव यांच्या फिर्यादीवरून निभोरा पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळणार !

Next Post

बैलगाडी उलटल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Next Post
बैलगाडी उलटल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

बैलगाडी उलटल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group