• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चारचाकीचा भीषण अपघात : ४ तरुण जागीच ठार

editor desk by editor desk
March 4, 2024
in क्राईम, राज्य
0
चारचाकीचा भीषण अपघात : ४ तरुण जागीच ठार

लातूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी ३ मार्च पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन बालाजी कोतवाल (वय २७) शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) कृष्णा विठ्ठल मंडले (वय २४) आणि नर्मन राजाराम कात्रे (वय ३३) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत तरुण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण स्विफ्ट डिझायर कारने तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.

दरम्यान, चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात कार आली असता, कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातरच कार समोरून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरक्षा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात चारही तरुणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Previous Post

दाम्पत्यानी घरातच सुरु केला होता वेश्या व्यवसाय ; पोलिसांची कारवाई

Next Post

टवाळखोरांचा हैदोस : रात्रीच्या सुमारास चारचाकीच्या काचा फोडल्या !

Next Post
टवाळखोरांचा हैदोस : रात्रीच्या सुमारास चारचाकीच्या काचा फोडल्या !

टवाळखोरांचा हैदोस : रात्रीच्या सुमारास चारचाकीच्या काचा फोडल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group