जळगाव : प्रतिनिधी
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचे नुसते नाव विचारले तरी स्फुलिंग जागृत होते. त्यांचा इतिहास आपल्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श प्रत्येकाने कृतीत उतरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळके येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवप्रेमी सोबत आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. बसस्थानक परिसरात भगवे झेंडे, कमानी व बॅनर मुळे वातावरण भगवामय झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील यांनी केले तर आभार आत्मा कमिटीचे अध्यक्ष पी. के. पाटील यांनी मानले.
या प्रसंगी सरपंच चंद्रकांत पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील , आत्मा कमिटीचे अध्यक्ष पी.के. पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन धनराज पाटील, शाखाप्रमुख कवीश्वर पाटील, देखरेख समितीचे माजी अध्यक्ष नारायण पाटील, पोलीस पाटील संजय चिमणकारे, ग्रा.पं. सदस्य निवृत्ती पाटील , प्रवीण पाटील, राजू पाटील सुनील पाटील अमोल पाटील यांच्यासह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर पाटील, स्वप्नील पाटील समितीचे सदस्य, गावातील युवक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले