नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लडाखमध्ये असलेल्या कारगिलमध्ये रात्री ९.३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जीवित व वित्तहानी झाल्याचे अद्याप कोणतेच वृत्त नाही. परंतु भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. शुक्रवारी श्रीनगर आणि गुलमर्गमध्ये ३.९ तीव्रतेचे धक्के जाणवले होते.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या काळात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ मोजण्यात आली होती. भूकंपाची खोली ५ किमी होती. या भूकंपामुळे कोणतेच नुकसान झाले नाही. भूकंपाच्या दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीर अत्यंत संवेदनशील मानले जाते, अशी माहिती सिस्मोलॉजी डिपार्टमेंटने दिलीय.