भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील गोजोरे येथे एका तरुणाला घरातून शेतात बोलावून बहिणीचं नाव का घेतो, या कारणावरून बेदम मारहाण करीत, त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि.१६ सकाळी १० वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यामुळे भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील विनोद गंभीर कोळी (वय २७) हा तरुण त्याचे आई, वडील, २ भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. विनोदच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आरोपी जितू प्रभाकर डोळे, समा प्रभाकर डोळे यांनी विनोदला मारहाण केली शुक्रवारीही घरी विनोद एकटाच असल्याचे पाहून त्याला श्रावण सुपडू डोळे याच्या मुलाने शेतात बोलावून घेतले.
शेतात श्रावण डोळे, जितू डोळे, समा डोळे यांच्यासह काहींनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला उचारार्थ जळगाव येथे दवाखान्यात हलिवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेत पोलिसांनी दोन संशयित आरोपी जितेंद्र डोळे (३०) व रामलाल डोळे (३५) यांना ताब्यात घेतले आहे.
भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर पोलिस अधिकारी अमोल पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात जात कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल्ल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तालुक्यात सातत्याने होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.