जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असतांना दि.९ रोजी शहरातील रिंग रोड परिसरातील एका बँकेसमोर रस्ता ओलांडणाऱ्या संगीता महेश लढे (वय ५४) या महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी शनिवार, १० फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रिंग रोड परिसरातील रहिवासी संगीता लढे (वय ५४) या शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी रात्री रिंग रोडवर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एका खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या कंपनीच्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. संतोष सोनवणे करीत आहेत.