जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जामनेर येतील एका ३१ वर्षीय इसमाची टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या गौरव गौतम बर्मन (२४, रा. राजरहाट, गोपालपपरा, कोलकाता) याला जळगाव सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला. गौरव गौतम बर्मन याने हा गुन्हा केल्याचे समोर आले होते. त्यानुसार जळगाव सायबर पोलिसांनी गौरव याला कोलकाता येथून अटक करून जळगावात आणले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार, पोहेकॉ हेमंत महाडिक, पोहेकॉ मिलिंद जाधव यांनी केली.