भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी व रेल्वे इंजिनिअरिंग विभागातील कर्मचारी धनराज भरत पवार (३६) यांचा मंगळवारी रात्री भुसावळ ते भादली दरम्यान अप रेल्वे लाईनवर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सुरुवातीस बराच वेळेपर्यंत ओळख पटली नव्हती मात्र नशिराबाद पोलिसांनी तपास केला असता बुधवारी ओळख पटली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी नशिराबाद पोलिस ठाण्याचे रामेश्वर मोताळे यांनी भेट दिली होती. धनराज पवार हे रेल्वे कर्मचारी सोबतच क्रिकेट खेळाडू सुद्धा होते दोस्ती क्रिकेट क्लबचे ते कर्णधार होते त्यांच्या निधनाने साकेगावात शोककळा पसरली. बुधवारी ३१ रोजी दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. धनराज यांच्या पश्चात आई-वडील मुलगा, मुलगी, सैन्य दलात असलेल भाऊ तसेच वहिनी असा परिवा आहे.