धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एकलग्न येथील ७५ वर्षीय वृद्ध चिंतामण किसन जोगी हे मुलाच्या घरी जात असताना वाटेतच एका झाडाला गळफास घेतला. मात्र, हा प्रकार याच रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी जोगी यांना खाली उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वृद्धावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, एकलग्न येथील चिंतामण किसन जोगी हे शनिवार, २७ जानेवारी रोजी पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे लहान मुलाकडेजाण्यासाठी घरून निघाले होते. पोहोचण्यापूर्वीच त्यांनी वाटेत एका झाडाला गळफास घेतला. त्याच वेळी या रस्त्याने त्यांचे काही नातेवाईक जात होते. त्यावेळी त्यांना जोगी यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.