Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून !
    क्राईम

    १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून !

    editor deskBy editor deskJanuary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच लातुरमधील उदगीर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असून नराधमांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय. सदर घटनेमुळे उदगीर हादरून गेलंय.

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुमठा येथे एका १४ वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना १३ जानेवारी रोज शनिवारी १२ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोविंद घुगे असं मृत मुलाचं नाव आहे. आपल्या मुलाचा कोणीतरी खून केलाय असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
    संतोष १० जानेवारी रोजी घरातून बाहेर गेला तो नंतर परतलाच नाही. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. १३ जानेवारी रोजी कुमठा शेत शिवारात या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. आपल्या मुलाला पाहून त्याच्या आई बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरल्याच्या संशयावरून या मुलाची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी क्रूरतेनं त्याला संपवलंय. त्याची ओळख कुणाला पटूनये यासाठी आरोपींनी त्याचा चेहरा विद्रूप केला. इतकेच नाही तर त्यांनी मुलाचे केस देखील कापून टाकले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम ३०२,२०१ भादवी प्रमाणे १३ जानेवारी रोज शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.