भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील फेकरी शिवारात रेल्वे प्रशिक्षण केंद्राजवळ शनिवारी दि.१३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. यात भावेश अनिल भालेराव (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाल असून त्याच्या डोक्यावर व गळ्यावर वार केले आहे.
माहिती कळताच घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, शहरचे सहायक निरीक्षक अनिल मोरे यांनी धाव घेतली. मृतदेह ट्रामा सेंटरला हलविण्यात आला असता तेथे त्याच्या नातेवाइकांची गर्दी जमली होती. दरम्यान, एका आरोपीस रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुका पोलिसात रात्री उशिरापयर्यंत गुन्हा दाखल करणे सरु होते.