लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी बैलगाडीच्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई केली. बोरी नदीपात्रात बैल गाडी च्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांना पकडून पोलीस बंदोबस्तात थेट तहसील कार्यालयात आणण्यात आले होते.
कारवाईत जप्त केलेल्या बैल गाड्या 15 असून 30 बैल जोडी व 15 धुरकरी जमा करण्यात आले आहे याना तहसील कार्यालय येथून गुन्हे दाखल करण्यासाठी सायंकाळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
कारवाईत टेम्पो धारकांवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तहसीलदार मिलींदकुमार वाघ व आरटीओ आर.एम.निमसे यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान छोटे छोटे टेंपो किंवा बैलगाडीतून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांसोबतच वाळू चोरीतील मोठे मासे देखील कारवाईच्या जाळ्यात येतील काय? अशी कुजबुज शहरात सुरू होती.