Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरची धडक : महिला जागीच ठार !
    क्राईम

    जळगावात दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरची धडक : महिला जागीच ठार !

    editor deskBy editor deskJanuary 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका परिसरातील दाम्पत्य अपघात होवून जखमी झालेल्या पुतण्याच्या भेटीला जात असतांना दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरने वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पुष्पा गुणवंत पाटील (वय ६६, रा. प्रेमनगर) या ठार झाल्या. तर त्यांचे पती गुणवंत पाटील (वय ७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय आयटीआय जवळ घडली, पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रेम नगरात गुणवंत पाटील हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला भेटण्यासाठी गुणवंत पाटील हे पत्नी पुष्पा पाटील यांना घेवून ते दुचाकीने कोल्हे नगरमध्ये जात होते. राष्ट्रीय महामार्गावर आयटीआय जवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला (डबल्यूबी ११ एफ ३०९६) क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने धडक दिली. धडक लागताच दुचाकीस्वार पाटील दाम्पत्य खाली पडले. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याठिकाणाहून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी जखमी झालेल्या पाटील दाम्पत्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या रुग्णालयात गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले. तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषित केले. अपघातात पुष्पा पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयत पुष्पा पाटील यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.