Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुंबईच्या केमिकल कंपनीमध्ये अग्नितांडव !
    क्राईम

    मुंबईच्या केमिकल कंपनीमध्ये अग्नितांडव !

    editor deskBy editor deskJanuary 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात नव्या वर्षाच्या सुरुवातील अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत असतांना आता नुकतेच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावणे एमआयडीमधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी सकाच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराळे लोळ पसरले आहेत.

    आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीच कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल कंपनी आहे. प्लॉट नंबर W5 आणि W6 वर असलेल्या या कंपनीत गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला अन् एकापाठोपाठ एक असे भीषण स्फोट झाले. आग इतकी भीषण होती, की परिसरात धुराचे लोळ पसरले. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, कंपनीला आग लागल्याचं कळताच परिसरात मोठा हाहाकार उडाला. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : चोरीच्या संशयावरून मुलींना उलटे टांगले; 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

    March 27, 2026

    बसस्थानकात ‘हातचलाखी’ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हद्दपार आरोपी पुन्हा गुन्ह्यात

    March 27, 2026

    जळगावात मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश :दोन आरोपी गजाआड !

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.