Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यात टोळक्यांनी केली मारहाण !
    क्राईम

    ३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यात टोळक्यांनी केली मारहाण !

    editor deskBy editor deskJanuary 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच ३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यातील टोळक्यांनी दोन जणांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीतील हा प्रकार आहे. रात्रीच्या सुमारास टोळक्यांनी दोघांना मारहाण केल्याने परिसरात एकच दहशत पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीत टोळक्यांनी दोन जणांना मारहाण केली. राहुल कावळे आणि निखिल पाबळे असे मारहाण झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ३१ डिसेंबरला भररस्त्यात मारहाण केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

    ३१ डिसेंबरच्या रात्री राहुल कावळे आणि निखिल पाबळे हे दोघे रस्त्यावरून जात होते. पुण्याच्या कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीतून जाताना सात ते आठ जणांचे टोळके आले. टोळक्यातील सात ते आठ जणांनी या दोघांना मारहाण केली. निखिल पाबळे हा रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी टोळक्यातील एकाने त्याला कानशिलात लगावली. मारहाणीचा जाब विचारल्याने टोळक्यातील सात ते आठ जणांनी या दोघांनाही बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत .

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण

    April 22, 2026

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    April 22, 2026

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.