कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहर गुन्हेगारीच्या घटनेमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना आता कोल्हापूर शहर देखील गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्या आहे. शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून उसाचा फड पेटवून दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेचा खून कऱण्यात आला आहे. या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहते. याप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने सदर महिलेला जबरदस्ती नेले. याठिकाणी त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आशाताईने विरोध केला. तो तिला शरीरसंबंध ठेव असे सांगत होता. मात्र तिने विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिचा गळा आवळून खून केला .
दरम्यान ही घटना कोणाला समजू नये म्हणून त्याने उसाच्या फडाला आग लावली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी योगेशनेच आटापिटा सुरु केला. तसेच उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता. यामुळे याबाबत कोणाच्या लक्षात आले नाही. गावातील कॉन्स्टेबल समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला. सीसीटीव्हीमुळे ही घटना समोर आली आहे. आरोपी हा त्याठिकाणी गेला असल्याचे दिसून आले. यामुळे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



