जळगाव
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात १ रुग्णाचा काल दि. २५ रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 3 दिवसांत एकूण 794 चाचण्यांमधून १ रुग्ण आढळला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 13 डिसेंबर रोजी ताप, खोकला व श्वासाचा त्रास जाणवू लागला, त्यांनी दि 20 रोजी एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण हा 6 ते 10 डिसेंबर च्या कालावधीत नेपाळ येथे गेल्याचे समजते. त्यांना सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील १४ जन हे निगेटिव्ह आले आहे.
रूग्णांची प्रकृती उत्तम आहे. एचआरसीटी रिपोर्ट २४ आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत.