भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला आहे. जगतारसिंग बिक्करसिंग बिलींग (वय ४५), रा. वरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथे जगतारसिंग उर्फ तारा बिक्करसिंग बिलींग हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शनिवार, २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने मोटार सायकल क्र. एमएच १९, डीयू -१२१८ याचेवर मागे पत्नी बसुन घरी जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येर्णाया खासगी बस क्रमांक एम.एच.४० ए.टी.०२८९ ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नी जखमी झाली या दोघांना १०८ अॅब्युलन्सने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे घेवून गेले त्या ठिकाणी जगतार उर्फ तारा हे उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. खासगी बस चालक वाजीद असमत अली (जयहिंद नगर, नागपूर) विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवलदार नावेद अली करीत आहे.