Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेच्या धडकेत जळगावातील लिपिक ठार !
    क्राईम

    रेल्वेच्या धडकेत जळगावातील लिपिक ठार !

    editor deskBy editor deskDecember 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    धावत्या रेल्वेच्या धडकेत तापी पाटबंधारे विभागातील लिपिक बळीराम माधव मराठे (५६, रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा) हे ठार झाले. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास आशाबाबानगरजवळील रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी मयताच्या मुलीने वडिलांना बघण्यासाठी आग्रह केला. पोलिसांनी तिला रोखल्यामुळे मुलीने आक्रोश केला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील सहयोग कॉलनीत रहिवासी बळीराम मराठे हे तापी पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून नोकरी करीत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील अपलाइनवरील खांब क्रमांक ४१७ जवळील ८ ते १० च्या दरम्यान, रेल्वेची धडक लागल्याने मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.

    या घटनेची माहिती लोको पायलटने रेल्वे पोलिसांना दिली. त्यानुसार आरपीएफ विनोद साळवे यांच्यासह रामानंदनगर पोलिस ठाण्यातील पोहेकों राजेश चव्हाण, पोलिस नाईक कालसिंग बारेला, नितेश बच्छाव, अजीज शहा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जावयाने ओळख पटवली घटनेची माहिती मिळताच बळीराम मराठे यांच्या मुलीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुलीने वडिलांना मृतदेह बघण्यासाठी आग्रह केला. मात्र, पोलिसांनी तिला रोखल्यामुळे मुलीने एकच आक्रोश केला होता. थोड्या वेळानंतर बळीराम मराठे यांच्या जावयाने त्यांची ओळख पटवली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.