जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा येथे घर भाडे देण्याच्या कारणावरून घर मालकाने शोभाबाई विनोद कोळी (३८) या महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवार, १७ डिसेंबर रोजी घडला. प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथे शोभाबाई विनोद कोळी (३८) या नीलेश दिलीप पाटील यांच्या घरात भाडे तत्वावर राहतात. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी – पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून घरमालक नीलेश पाटील विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गफूर तडवी करीत आहेत.