• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील खून प्रकरणी : तिसरा संशयित अटकेत !

editor desk by editor desk
December 15, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील खून प्रकरणी : तिसरा संशयित अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरातील समता नगरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून चॉपरने वार करून अरुण बळीराम सोनवणे (वय २८) या तरुणाचा गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने तिसऱ्या संशयिताला अटक केली आहे. प्रवीण उर्फ दोघ्या पिंट्या शिरसाळे असे संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण सोनवणे सोबत प्रवीण उर्फ दोध्या पिंट्या या संशयीताच्या पुतणीचे लग्न ठरले होते. या लग्नास योद्धा उर्फ पिंट्या याचा विरोध होता. यातूनच अरुणचा खून झाला असल्याची माहिती समोर आली होती. संशयीत अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील नेपानगर येथून अटक केली होती.

तत्पूर्वी एलसीबीचे पो.नि. किसन नजन-पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून ताब्यात घेतले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकाने प्रवीण उर्फ दोध्या पिंट्या प्रेमराज शिरसाळे रा.संभाजी नगर, जळगाव याला ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सफौ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, विजय पाटील, किरण धनगर, सचिन महाजन, संदिप सावळे, किरण चौधरी, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर हे त्याच्या मागावर होते.

पिंट्या हा त्याचे मुळ गावी नागदुली-म्हसावद येथे आला असून तो तेथून निघुन बाहेरगावी निघुन जाण्याचे तयारीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून पथकाने शिरसोली मार्गे वावडदा येथे जावून तिथे सापळा लावला असता वावडदा बसस्टॅन्ड येथील सरपंच चहाचे टपरीचे आडोश्याला उभा असताना पिंट्याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यातील तीन संशयीत अटक झाले असून अद्याप दोघे फरार आहेत.

Previous Post

खळबळजनक : पाकिस्तानला माहिती देणारा मुलगा पाचोऱ्याचा !

Next Post

गिरणा नदीत आढळला एकाचा मृतदेह !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

गिरणा नदीत आढळला एकाचा मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group