जळगाव : प्रतिनिधी
घरात वायरिंगचे काम करतांना विजेचा शॉक लागून प्रौढ जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे विजय वसंत वाघ हे वास्ताव्यास आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास विजय वाघ हे त्यांच्या घरात वायरिंगचे काम करीत होते. त्यांना विजेचा धक्का लागल्याने विजय वसंत वाघ (४५, रा. मोहाडी, ता. जळगाव) हे जखमी झाले. त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.