भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी (ता.१३) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तीने मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख यांचा विश्वास संपादन करून शासकीय योजनेचा फायदा मिळवून देत असे सांगत एक लाख बहात्तर हजार रुपयात फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख (वय ७५) हे दि.१३ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी संशयित आरोपी एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील तोंडाला रुमाल लावलेला नाव गाव माहिती नाही. याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून शासकीय योजनेचा फायदा मिळवून देतो असे सांगून सोबत नेवून फसवणुकीतील एक लाख रुपयांचे दोन सोन्याचे कंगण प्रत्येकी १२.५ ग्रॅम वजनाचे २५ ग्रॅम तसेच बहात्तर हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चैन १५ ग्रॅम वजनांची व त्यात सोन्याचे पैडल ३ ग्रॅम वजनाचे एकूण १८ ग्रॅम वजनांचा मुद्देमाल त्याच्या प्रवासाच्या बँगत ठेवायला लावून सदरील बँग ही भुसावळ शहरातील जवाहर डेअरी जवळील कटलरीच्या दुकानवाल्याजवळ ठेवायला लावून नंतर येथे पुन्हा येऊन त्या बॅगेतील फिर्यादीचे सोन्याचे दागिने काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक करून घेवून गेला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स. फौ सत्तर शेख करीत आहे.