नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्याच्या तरूणाईला सोशल मीडियावरील वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील. तसंच रिल्स बनवण्याच मोठ्या प्रमाणात वेड लागले आहे. पण अशातच काहीनां आपल्या जीवाला मूकावे लागते. तरी या गोष्टीतून धडा न घेता स्टंट करण्याचे तरुण तसेच तरुणी थांबत नाही. अशी एक घटना आगऱ्यातील लखनऊमध्ये घडली आहे. आगऱ्यामधील लखनऊ एक्सप्रेस हायवेवर काही तरुण स्वत:चा जीव धोक्यात टाकून रील्स बनवत होते. याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणांविरोद्धात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.८ बुधवारी रोजी ही घटना सोशल मीडियावरील इन्टांग्रामवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसत आहे की, लखनऊमधील एका मोठ्या हायवेवर काही तरुण आपल्या कार घेऊन स्टंटबाजी करत आहेत. स्टंट करताना जोरदार आवाजात हरियाणवी गाणी लावली आहेत. यात एका कारचालकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावले आहे. त्याच्याजवळ असलेल्या कार रस्त्याच्यामधोमध चालवत आहे तर कधीमध्येच ओव्हरटेक करताना दिसत आहे. कारला काळ्या रंगाच्या काचा लावने गुन्हा आहे. तरी आपल्याला या व्हिडिओत कारला काळ्या रंगाच्या काचा लावेल्या दिसत आहे.
तसंच दोन कारला नंबर पेल्टही लावलेली नाही सदर व्हिडिओ लखनऊमधील फतेहाबाद आणि डौकी परिसरातील सांगितला जात आहे. रिल्स बनवण्याच्या नादात या तरुणांनी वाहतूकीचे नियम पायदळी तूडवले आहेत. याच्यां रिल्स बनवण्याच्या नादात रोडवरून एखाद वाहन जोरदार आल असत तर भंयकर असा अपघात होऊ शकला असता याचाही तरुणांनी विचार केला नाही. व्हिडिओ व्हायरल होताच. फतेहाबादमधील एसीपी यांनी म्हटले की, या तरुणांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल.